एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- चोरीच्या मोटारसायकलसह चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून सिंधी कॉलनी परिसरातून चोरी झालेली मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली आहे.
सुभाष ममराज राठोड (रा. खेडगाव तांडा ता. एरंडोल जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. रवी वासुदेव कुकरेजा यांची मोटार सायकल त्यांच्या घरासमोरुन चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पो.नि. बबन आव्हाड यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सुभाष राठोड यास गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.
केलेल्या चौकशीअंती गुन्हा उघडकीस आला. त्याच्या कब्जातून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, पो.नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. छगन तायडे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.