रावेर तालुक्यातील घटना
रावेर (प्रतिनिधी) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या अपघातात कर्जोद येथील ६० वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार दिनांक ९ रोजी सकाळी जुन्या पातोंडी गावाजवळील रोडवर घडला. रावेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चुडामण लहानू भालेराव (वय ६०, कर्जोद, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे. अजय अशोक शिरतुरे (वय ३०, रा.विवरा बु., ता.रावेर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह चुडामण भालेराव हे दुचाकी (एम.एच.१९ ईडी ७५९२) ने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर (एम.एच.२९ आर.८९०२) ने कट मारला. त्यात दुचाकी रस्त्यावर पडून तक्रारदार यांच्या हाता-पायाला ईजा झाली.
तर चुडामण भालेराव यांच्या डोक्याला मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शेख अलीम शेख सलीम ( रा. मदिना कॉलनी, रावेर) यांच्याविरोधा रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.