जळगाव तालुक्यातील भादली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली गावाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने एका झारखंड येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक १२ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. या प्रकरणी शनिवारी १३ जुलै रोजी पहाटे ३ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भादली ते भुसावळ दरम्यान डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४३३ च्या १३ ते १५ दरम्यान एक जण मयत अवस्थेत पडलेला असल्याची माहिती नशिराबाद पोलिसांना देण्यात आली. (केसीएन)त्यानुसार पोलिस तेथे पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. सुरुवातीला अनोळखी म्हणून नोंद असलेल्या या तरुणाची कागदपत्रांवरून ओळख पटली. त्याचे नाव संतोषसिंग व तो झारखंडचा असल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली. या तरुणाच्या खिशात उधणा ते भुसावळपर्यंतचे रेल्वे तिकीट सापडले. याप्रकरणी शनिवार दिनांक १३ जुलै रोजी पहाटे ३ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहेत.