भुसावळ रेल्वे स्टेशनजवळील घटना
भुसावळ(प्रतिनिधी ) मोबाईलवर बोलत जाणाऱ्या एका तरुणाचा हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी चोरून नेल्याची घटना शहरातील रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली असून याप्रकरणी गुरुवारी १८ जुलै रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश हरिदास घोडाम सरोज वय-३८, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ता. भुसावळ हा तरुण बुधवारी १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता तो दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात दोन जणांनी त्याच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेल्याची घटना घडली.तरुणाने आरडाओरड केली मात्र काहीही उपयोग झाला नाही . गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.