• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मिरवणुकीत नाचल्यावरून गावगुंडांची १० जणांना लाठ्याकाठ्यानी मारहाण, एक गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2023
in Uncategorized
0
मिरवणुकीत नाचल्यावरून गावगुंडांची १० जणांना लाठ्याकाठ्यानी मारहाण, एक गंभीर

पारोळा तालुक्यातील पिंप्री येथील घटना

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिंप्री प्र. ऊ. येथे गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्री मिरवणुकीत का नाचताहेत म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून गावातील गावगुंडांनी दोन तरुणांना मारहाण केली. त्यांना आवरण्यास आलेल्या इतर ८ जणांनादेखील लाथाबुक्क्यांनी, फायटर, लाठ्याकाठ्यांनी संशयित १६ आरोपींनी बेदम मारहाण केली आहे. यातील एका संशयितांविरुद्ध बेकायदा गावठी पिस्तूल वापरत असल्याबाबत तहसीलदारांनी महिन्याभरापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहे. मारहाण प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलाबाई पंडित भिल (वय ५२, रा. पिंप्री प्र. ऊ. ता. पारोळा) यांनी फिर्याद दिली आहे. श्री गणेश विसर्जन दिवशी २८ रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या घराजवळील गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरु होती. त्यावेळी संशयित आरोपी प्रमोद रामलाल पाटील, छोटू उर्फ रामकृष्ण गंभीर पाटील, प्रेम प्रमोद पाटील, रोशन भाऊसाहेब पाटील, महेंद्र भाऊसाहेब पाटील, सुमित अनिल पाटील, शरद दयाराम पाटील, स्वप्नील अनिल पाटील, ऋषिकेश बाबू पाटील, समाधान युवराज पाटील, बापू किशोर पाटील, सनी अनिल पाटील, सोन्या विलास पाटील, गोपाल भाईदास पाटील, बंटी संजू पाटील, मयूर रामकृष्ण पाटील हे मिरवणुकीत नाचत होते.

त्या मिरवणुकीत आनंद आबा भिल, अजय भिल हे नाचण्यासाठी गेले असता त्याला प्रमोद पाटील याने मज्जाव केला. त्याचा जाब विचारला असता संशयित आरोपींची जातीवाचक बोलून दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांना आवरण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य पंडित मोतीलाल भिल (वय ५८) हे गेले असता, त्यांना संशयितांनी काठीने डोक्यात जबर मारहाण करून दगड मारला. त्यात ते गंभीर झाले. त्यावेळी गल्लीतील इतरांनी देखील त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली असता संशयितांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी तुडवत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. तसेच सुनील रामा पगारे यांचे घरासमोर उभे राहून संशयितांनी त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून सुनील व त्यांच्या पत्नीला जबर मारहाण केली.

यात आनंदा भिल, अजय भिल, पंडित भिल, फिर्यादी नीलाबाई भिल, भिवसन भिल, विशाल भिल, राहुल भिल, शैलेश पगारे, सुनील पगारे, ज्योत्स्ना पगारे असे दहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पारोळा कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंडित भिल यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी न्यावे लागले. दरम्यान, पारोळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर हे तपास करीत आहेत. यातील संशयित प्रमोद रामलाल पाटील याच्याविरुद्ध अवैध गावठी पिस्तूल बाळगत असल्याबाबत १ सप्टेंबर २३ रोजी तहसीलदार (महसूल) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे. तसेच एक वर्षांपूर्वी पिंप्री ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रमोद पाटील हा वाळू चोरी करीत असल्याबाबत व समज देऊनही ऐकत नसून कारवाईकरीता पत्र दिलेले आहे. त्यामुळे गावात दहशत पसरवित असलेल्या गावगुंडांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


 

 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/mirvanukivarun-marhan-news/
Previous Post

गुन्हेगार संतोष राऊत ‘एमपीडीए’ अंतर्गत औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध

Next Post

अवैधपणे गुरे वाहतूक थांबवली, तीन आयशर वाहनांसह ५३ म्हशी ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैधपणे गुरे वाहतूक थांबवली, तीन आयशर वाहनांसह ५३ म्हशी ताब्यात

अवैधपणे गुरे वाहतूक थांबवली, तीन आयशर वाहनांसह ५३ म्हशी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार
Uncategorized

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
Uncategorized

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

August 11, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon