जळगाव (प्रतिनिधी) : म्हसावद स्टेशन मधील रेल्वे फाटक क्रमांक १४४ हे वाहतुकीसाठी आज दि. ५ जुलै ते दि. १० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
रेल्वे रुळाची दुरुस्ती, छनाई आणि स्लीपर बदलण्याचे काम यादरम्यान करण्यात येणार आहे. तरी रेल्वे फाटक १४४ हे १० जुलैपर्यंत बंद राहील, याची नोंद ग्रामस्थांनी घ्यावी. पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पाचोरा मध्य रेल्वेचे वरिष्ठ अनुभाग अभियंता यांनी कळवले आहे. त्याबाबतचे पत्र म्हसावदचे रेल्वे स्टेशन प्रबंधकांना देण्यात आले आहे.