वेळेआधीच अर्ज दिल्यानंतरही अर्ज फेटाळल्याचा कुलभूषण पाटलांचा आरोप
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील प्रभाग क्रमांक १० येथील महाविकास आघाडीचे उमेदवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार लढत देत होते. निकालामध्ये महायुतीचे उमेदवार यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. त्यानंतर मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी मतदानाची फेर मोजणी करावी म्हणून अर्ज दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी हा अर्ज फेटाळून लावला. यावेळी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.

१२ वाजेच्या सुमारास फेर मोजणीचा अर्ज दिलेला असतानाही मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. तसेच मतपेटी बंद करून स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवून दिल्या, हे चुकीचे आहे असे आरोप कुलभूषण पाटील यांनी केला. या वेळेला पोलीस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करीत सुरुवातीला पत्रकारांना धक्काबुक्की करीत बाहेर काढले. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते हे घटनास्थळी आले.त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यानंतर मात्र वातावरण चांगले संतप्त झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचे ऐकून घेतले नाही. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलीस बळाचा वापर करीत उमेदवार कूलभूषण पाटील यांना मारहाण करून तसेच इतर पोलिसांनी इतर कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून त्यांना मतदानाच्या केंद्रबाहेर काढले. या वेळेला वातावरण प्रचंड गरम झाले. प्रसंगी महायुतीचे उमेदवार मात्र मतमोजणीच्या केंद्राच्या आत आणि महाविकास आघाडीचे बाहेर यामुळे देखील वातावरण पुन्हा गरम झाले.
पोलीस प्रशासनाने दूजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मात्र आतमध्ये आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र मतदान केंद्राबाहेर यामुळे लोकशाहीची गळचेपी होत असल्याचा आरोप करीत पोलिसांना लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला.









