भुसावळ येथील घटना
भुसावळः- काहीही कारण नसतांना एका तरूणाला फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत करून गळ्यातील सोन्याची चैन व दीड हजार रूपयांची रोकड जबरी काढून नेल्याची घटना शहरातील ख्रिश्चन कब्रस्थान परिसरात शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी २२ जून रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सम्राट सुरेश बनसोडे (वय ३४) रा. स्नेह नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह राहायला असून शुक्रवारी २१ जून रोजी रात्री ८.३० वाजता सम्राट बनसोडे हा तरूण भुसावळ शहरातील ख्रिश्चन कब्रस्थानजवळ उभा होता. त्यावेळी विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ हे दोन जण सम्राट जवळ गेले. व काहीही कारण नसतांना त्याला फायटरने बेदम मारहाण केली
. या मारहाणीत सम्राटला जखमी करत त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन आणि खिश्यातील दीड हजारांची रोकड जबरी हिसकावून पसार झाले. याप्रकरणी शनिवारी २२ जून रोजी रात्री १२.३० वाजता तरूणाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विवेक शेकळे व आतिश खरात दोन्ही रा. भुसावळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहे.