नवी दिल्ली ;- टीम इंडियाने 6 पैकी 5 सामने जिंकून T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले असून ग्रुप स्टेजजंतर टीम इंडियाने सुपर-8 मध्ये अफगाणिस्तान आणि बांग्लादेशवर विजय मिळवला.मात्र अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने ग्रुप 1 मधील चुरस वाढली आहे. सगळ्यांची नजर यावर आहे की, ऑस्ट्रेलिया बाहेर होणार की, अफगाणिस्तानचा प्रवास थांबणार. पण दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की, इतक दमदार प्रदर्शन करुनही टीम इंडिया सुद्धा एका पराभवामुळे सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.
ग्रुप-1 मधील शेवटच्या दोन सामन्यां निकालांवरून आता पुढचे गणित ठरणार असून त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज 24 जूनला टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये सामना होईल तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सामना होईल.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवलं, तर ते सेमीफायनलमध्ये पोहचणार ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. मात्र क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते त्यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून हरल्यानंतरही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकते. पण पराभवाच्या अंतरावर सुद्धा बरच काही अवलंबून आहे. कारण सगळा विषय नेट रनरेटवर येऊन अडकतो.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या अंतराने हरवलं किंवा 31 पेक्षा जास्त चेंडू राखून हरवलं, तर टीम इंडियाचा रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी होईल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि भारताचे 4-4 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स पहिल्या-दुसऱ्या नंबरवर असतील.
अफगाणिस्तानची टीम फॉर्ममध्ये आहे, त्यांनी बांग्लादेशला 80 किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या फरकाने हरवलं, तर अफगाणिस्तानचा रनरेट भारतापेक्षा जास्त होणार आहे. त्यामुळे . अशी स्थितीत अफगाणिस्तान, भारत आणि ऑस्ट्रेलिया तिघांचे प्रत्येकी 4-4 पॉइंट होतील. नेट रनरेटच्या आधारावर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या-दुसऱ्या नंबरवर राहतील. दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील. टीम इंडियाचे आव्हान संपुष्टात येईल.