लघवी करण्यास विरोध केला म्हणून तरुणावर लाकडी काठीने हल्ला


जळगावच्या नागसेननगरातील घटना; मित्रालाही मारहाण, एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव : रस्त्याच्या कडेला लघवी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करून लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना नागसेननगर परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सुपडू सपकाळे (वय २२, रा. रामेश्वर कॉलनी, महादेव मंदिरासमोर, नागसेननगर, जळगाव) हा मजुरीचे काम करतो. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो घराच्या मागील मोकळ्या मैदानात लघवी करण्यासाठी गेला होता.
यावेळी शुभम नाना सोनवणे (रा. मेहरूण परिसर, जळगाव) याने तेथे लघवी करू नको, असे सांगत स्वप्नीलला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्याशी वाद घालत धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाद वाढल्यानंतर शुभम सोनवणे याने स्वप्नीलच्या डाव्या हातावर लाकडी काठीने मारहाण केली.
दरम्यान, स्वप्नीलचा मित्र सागर साळवे हा त्याला वाचविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या मारहाणीत स्वप्नीलच्या उजव्या हाताला तसेच डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली.
या प्रकरणी स्वप्नील सपकाळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन बडगुजर करीत आहेत.









