यावल तालुक्यातील घटनेने खळबळ
यावल (प्रतिनिधी) : – येथील श्री समर्थ सतगुरु हाँल जवळील रहिवाशी असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाने घराशेजारीच असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज ४ रोजी सकाळी उघडकीस आला. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आधार सिताराम पाटील (वय ७६, रा. मनवेल)असं मयत वृद्धाचे नाव आहे. दि. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास मनवेल गावातील आपल्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठयात गळफास घेतला. पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील (वय ४६ वर्ष) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवुन तात्काळ त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून आधार पाटील यांना मृत घोषीत केले. वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयत आधार पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी केले असुन, मयताचा पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सूना, नातवंड असा परीवार आहे. पुढील तपास हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी करीत आहे.