जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमीत्त डीवायएसपी भुसावळ कार्यालयात जगावे आनंदे संपन्न
भुसावळ प्रतिनिधी) :- धावपळीच्या या जिवनात मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून मानसिक आरोग्याबददल जनजागृती ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. केतकी पाटील यांनी डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आयोजित ’ जगावे आनंदे ’ मानसिक आरोग्य (मेंटल स्ट्रेस) कार्यक्रमात केले.
डीवायएसपी कार्यालय भुसावळ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर मंचावर डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे, डीवायएसपी पवार, डॉ. केतकी पाटील, डॉ. विलास चव्हाण व डॉ. बबन ठाकरे उपस्थित होते . पुढे बोलतांना त्यांनी मानसिक आजारी असणे ही आजकाल च्या फास्ट आयुष्यात साधारण गोष्ट आहे. व्यक्ती जेवढ्या मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा त्याच्या संभाषणावर मर्यादा येत असतात. व्यक्त होत आपले छंद जोपासून सुद्धा मानसिक तणाव कमी करता येतो असे सांगितले.
डीवायएसपी – पिंगळे यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, सण व उत्सव काळात पोलीस सतत कार्यरत असतात. यामुळे पोलिसांना मानसिक त्रास होत असतो. दररोज वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींशी त्यांचा संपर्क होतो त्याचाही परिणाम होत असतो असे सांगितले. डॉ. विलास चव्हाण यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो. कुणापेक्षा अधिक आत्महत्या होत असतात. खेळ खेळल्याने तणाव कमी होत असतो. समस्यांबद्दल बोला, शारीरिक फिटनेस महत्त्वाची आहे. जर स्ट्रेस मॅनेज होत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या असे सांगितले.डॉ. बबन ठाकरे यांनी गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. स्वतःला वेळ द्या, तुमचा तणाव निश्चित कमी होईल. स्वतःला व्यक्त करा असे सांगितले.यानंतर उपस्थितांच्या शंकांचे समाधान यावेळी करण्यात आले करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. नि. आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाला भुसावळ विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.