जळगाव ;- येथील नवीन बसस्थानक परिसरातून एका महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना १८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, अशोक नगर, जामनेर येथील रहिवाशी असलेल्या सुनिला राजरत्न भोगे वय ४२ रा. या कामनिमित्ताने मंगळवारी १८ जून रोजी जळगाव शहरात आल्या असता सायंकाळी साडेपाच वाजता त्या जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात त्यांच्या गळ्यातीन २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला. त्यानंतर महिलेने मंगळसुत्रांचा शोध घेतला. परंतु अज्ञात चोरट्याचा थांगपत्ता ना लागल्याने अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख ह्या करीत आहे.