• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

‘वारी‘ला रसिकांची दाद; सागर सदावर्ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या ‘वारी‘ या नाटकाने रसिकांची मने जिंकत विजेतेपद पटकावले.

        १ व २ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड व जळगाव परिमंडलाने सहभाग घेतला. जळगाव परिमंडलातर्फे डॉ.समीर मोने लिखित व सागर सदावर्ते दिग्दर्शित ‘वारी‘ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासाची वारी ही कालही तशीच होती. आजही तशीच आहे. संत–महात्म्यांच्या शिकवणीतून, अनुभवातून बोध घ्यायचा आणि आपल्या अस्तित्त्वाचा झेंडा रोवायचा, हा संदेश देणाऱ्या या नाटकास रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. कथानकाची प्रभावी मांडणी, कलाकारांचा जिवंत अभिनय, नेपथ्याची कल्पकता, प्रकाशयोजनेतील अचूकता तसेच आशयाला पूरक संगीत, रंगभूषा आणि वेशभूषेच्या सुरेख संयोजनामुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला. या सर्व बाबींच्या एकत्रित परिणामातून जळगाव परिमंडलाने स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.

         मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, मनीष ठाकरे, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, जीवन चव्हाण, परीक्षक डॉ.दिलीप घारे, पद्मनाभ पाठक, योगिता महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांच्या हस्ते दिग्दर्शक सागर सदावर्ते, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड व कलावंतांनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. संघास मिळालेली पारितोषिके : दिग्दर्शन : प्रथम – सागर सदावर्ते, अभिनय (पुरुष) : द्वितीय – राहुल निकम, नेपथ्य : प्रथम – कमलेश भोळे, प्रकाशयोजना : प्रथम – रवींद्र चौधरी, संगीत : प्रथम – आशिष कासार, रंगभूषा व वेशभूषा : प्रथम – दीपक कोळी, उत्तेजनार्थ (अभिनय) : दीपाली नरवाडे, उत्कृष्ट बालकलाकार : समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी, गीतार्थ भोळे.

        जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी हे या नाटकाचे निर्माते, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे हे सहनिर्माते आहेत. नाटकात राहुल निकम, सागर सदावर्ते, दीपक कोळी, दीपाली नरवाडे, भीमराव सपकाळे, जागृती वाकेकर, रवींद्र चौधरी, कमलेश भोळे, भावना चिडाम, श्रीकृष्ण ठाकूर, अक्षय पाटील, दीपक वंजारी, सचिन भावसार, त्रिकाल अडाणे, पूर्वा जाधव, समर्थ जाधव, दुर्वा वंजारी, गोरक्ष कोळी, गीतार्थ भोळे, हर्षदा चौधरी, मेधा सदावर्ते, भावना निकम, कोमल भोळे, पूनम दडमल, आशिष कासार यांनी भूमिका साकारल्या. अरुण शेलकर, अनिल वाघ, अमित सोनवणे यांचे नाट्यनिर्मितीस सहकार्य मिळाले. विशाल जाधव यांनी संघास मार्गदर्शन केले. या यशाबद्दल मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी व जळगाव परिमंडलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे.

कॅप्शन : महावितरणच्या प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत विजेतेपद पटकावणारा जळगाव परिमंडलाचा संघ.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

चोपड्यात ४५ हजारांचा रिअलमी मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद
खान्देश

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
चोपड्यात ४५ हजारांचा रिअलमी मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

चोपड्यात ४५ हजारांचा रिअलमी मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 3, 2026
पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला
क्राईम

पाळधीत घराबाहेर लावलेली बजाज प्लॅटिना मोटारसायकल चोरीला

October 3, 2026
बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला
क्राईम

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
चोपड्यात ४५ हजारांचा रिअलमी मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

चोपड्यात ४५ हजारांचा रिअलमी मोबाईल चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon