जळगाव (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून इन्स्टाग्रामद्वारे ओळख निर्माण केलेल्या तरुणाने तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जळगाव शहरातील सारा हॉटेल तसेच नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीसोबत इन्स्टाग्राम अँपद्वारे ओळख झाली. आरोपीने पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील सारा हॉटेल येथे, तसेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान नाशिक येथील टाउन हाऊस हॉटेलमध्ये पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपीने लग्न करण्यास नकार देत पीडितेला मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात आकाश गजानन चव्हाण वय ३५ रा. बोरगाव ता.जि. अकोला ह.मु. चित्रकुट मध्यप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास PSI सावित्री ढगे यांच्याकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपी अद्याप अटकेत नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.









