• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खान्देशात अवकाळी वादळी पावसाने २६६६ खांब, ६५ रोहित्र सांगाडे जमीनदोस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खान्देशात अवकाळी वादळी पावसाने २६६६ खांब, ६५ रोहित्र सांगाडे जमीनदोस्त

कर्मचाऱ्यांनी वीजयंत्रणा केली पुर्ववत ; महावितरणच्या सातत्यपुर्वक परिश्रमाला यश

जळगाव (प्रतिनिधी) :- मे महिन्यात मागील पंधरा दिवसांपासून महावितरणच्या जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीत परिमंडलातील वीज यंत्रणेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांवरील सुमारे २ हजार ६६६ खांब जमीनदोस्त झाले. ६५ ठिकाणी रोहित्र सांगाडे (डीपी) कोसळून नादुरुस्त झाले. हजारो ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्या. बहुतांश ठिकाणी हजारो झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, वीज यंत्रणेतील जनमित्र, अभियंते, दुरुस्ती व देखभालीसाठी नेमलेल्या कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यपुर्वक सतर्क राहून बहुतांश प्रमाणात नादुरुस्त झालेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात यश मिळविले आहे.

मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व कामे सुरु केलेली आहेत. यात विना अडथळा अखंडित व सुरळीत वीज पुरवठ्यासाठी वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्त करणे, स्पेसर्स बसविणे, तारांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या काढणे आदी कामे करण्यात येतात. दरम्यानच्या काळातच अवकाळी वादळी पावसाने थैमान घातल्याने वीज यंत्रणेवर अधिकचा ताण पडलेला आहे.(केजीएन)वादळी पावसाने वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रभावीत झाली असली तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्वक अथक परिश्रम घेऊन नादुरुस्त यंत्रणा पूर्ववत करण्यात यश मिळविले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील गावठाण व त्यानंतर कृषीप्रवण भागात प्राधान्य क्रमाने यंत्रणा दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. परिमंडलात सुमारे ६५ ठिकाणी वीज वितरण रोहित्रांचे सांगाडे कोसळून रोहित्र नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या.

अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली. अशा ठिकाणी उन्मळलेली तारांवरील झाडे बाजूला काढण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला. सुमारे ४२ वीज उपकेंद्रही प्रभावीत झाली होती. तीही तत्काळ दुरुस्त करण्यात आली. हजारो ठिकाणी लघुदाब उच्चदाब वाहिन्या तुटल्या गेल्या. एकूणच विस्कळीत झालेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी दिवसाच्या कालावधीसह रात्रीच्या वेळीही अगदी बॅटऱ्यांचा वापर करुन वादळ, वारा आणि पावसातही वीज कर्मचारी कार्यरत राहीले.(केजीएन)वादळी वारा आणि पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत कुठे वीज अपघात होणार नाही याची काळजी घेत “लाईन फॉल्ट” शोधून दुरुस्ती मोहीम राबवत वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात आली. अशा प्रतिकूल काळात ग्राहकांनी क्षेत्रिय पातळीवर काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना थेट फोन न करता विजेसंबंधी काही तक्रारी असतील तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डी.एस.एस. कंट्रोल रुमशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

त्यासाठी जळगाव जिल्ह्याकरीता ७७९८१२०१५५, धुळे ७८७५७६६७६३ व नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांनी ७८७५५५४५४३ या क्रमांकावरुन डी.एस.एस. कंट्रोल रुमशी संपर्क साधावा. या शिवाय १९१२, १८००२३३४३५ व १८००१०२३४३२ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येणार आहे. प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी फोन केल्याने त्यांच्या कामात अडथळे येवून प्रसंगी त्यांचा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपरोक्त प्रमाणे दिलेल्या क्रमांकावरच नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

महाराष्ट्रातील १५ अमृत भारत स्टेशनांचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन

Next Post

तिकिटाचा काळाबाजार करणारा दलाल अटकेत, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तिकिटाचा काळाबाजार करणारा दलाल अटकेत, गुन्हा दाखल

तिकिटाचा काळाबाजार करणारा दलाल अटकेत, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon