• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या बनावट नवरीसह टोळी गजाआड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
लग्नाचा बनाव करून पैसे उकळणाऱ्या बनावट नवरीसह टोळी गजाआड

धुळे पोलीसांची धडाकेबाज कारवाई

धुळे (प्रतिनिधी) : लग्नाचे आमिष दाखवून धुळ्यातील तरुणाला तीन लाखाचा गंडा घालणाऱ्या बनावट नवरी आणि तिच्या बनावट नातेवाईकांना गजाआड करण्यात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन असणाऱ्या बनावट नवरीसह तिच्या तिघा नातेवाईकांना ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी देखील पथक रवाना करण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी दिली आहे.

धुळे येथील चाळीसगाव रोड परिसरात राहणारे ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी हे त्याच्या लग्नाकरीता मुलीच्या शोधात असतांना एजंट मोरे यांनी बनावट नवरी मुलीचा फोटो चौधरी यांच्या मोबाईल वर पाठविला. सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक २० ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. तेथे त्यांना फोटो मधली बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली. यावेळी नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते. त्यानंतर दि. २२ रोजी एजेंट मोरे हा फिर्यादीचे घरी गेला. सदर मुलीला दुसरे स्थळ आले असुन तुम्हाला या मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रूपये द्या, अशी मागणी केली. त्यानुसार चौधरी यांच्या वडिलांनी लग्नासाठी ३ लाख रूपये गोळा करून दिले. त्यानंतर दि२३ ऑगस्ट रोजी फिर्यादी चौधरी व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, येथे गेले. तेथुन बिजासनी माता मंदिर येथे हिंदु रिती रिवाजा नुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले.

लग्न करून व-हाड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांचेसह घरी परत येत असतांना धुळे तालुक्यातील सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवणासाठी थांबले. याच संधीचा फायदा घेवून बनावट नवरी व तिची आई हे बाथरूमला जाण्याचा बनाव करून हॉटेलच्या बाहेर गेल्या व अज्ञात इसमाचे मोटार सायकलवर बसून पळून गेल्या. या संदर्भात फसवणूक झाल्याने चौधरी यांनी धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याची सर्व माहिती घेतली. तसेच या गुन्ह्यात अन्य जिल्ह्यातील तसेच दुसऱ्या राज्यातील आरोपी देखील सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना आरोपींना गजाआड करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश केले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी एक पथक गठीत करून तपासाला चालना दिली. सपोनि बोरसे यांनी दोन तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. आरोपी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात लपण्याचे ठिकाण बदलत फिरत असल्याचे तपासात समोर आल्याने पोलीस पथक त्यांच्या मागावर होते.

तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून पोलीस पथकाने आरोपीताचा शोध घेवून संशयित आरोपी सुनिल पदमसिंग चव्हाण, रा. दुधखेडा, ता. शहादा, (बनावट नवरी मुलीचा भाऊ), नसीम मुजफ्फर खान पठाण, रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा (एजंट) ,भागाबाई बळीराम गवळी, रा. रायसिंगपुरा नंदुरबार, (बनावट नवरी मुलीचा आई), नादरसिंग उर्फ महाराज भंटूसिंग रावत (पावरा), ( बनावट नवरी मुलीचा मामा) यांना अटक करण्यात यश आले. एक विधीसंघर्षीत बालिका (बनावट नवरी मुलगी) हीस ताब्यात घेवून रिमांड होम येथे जमा करून इतर आरोपींकडून अपहारीत रक्कम व एक मोटार सायकल जप्त केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता यात आणखी नावे पुढे आली आहेत. साईबाई बाद-या पावरा, रा. मानमोडया, ता. शहादा, संजय रामा भिल, रा. दुधखेडा, ता. शहादा, जलनसिग प्रेमसिंग मोरे, रा.नांदया, ता. शहादा यांचादेखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलीस पथक या आरोपींच्या मागावर आहेत


 

 

Previous Post

चोरटयांनी दवाखान्याचा एसी नेला चोरून

Next Post

सार्वजनिक उत्सव, उपक्रमांना वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी आवश्यक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सार्वजनिक उत्सव, उपक्रमांना वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी आवश्यक

सार्वजनिक उत्सव, उपक्रमांना वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon