चाळीसगाव तालुक्यातील लौजें येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील लौजे येथे किरकोळ वादाच्या कारणावरून दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात कु-हाडीने व दोन्ही हातावर दांड्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लौजे तांडा रस्त्यावर रमेश पवार यांचे दुकानासमोर दि. ७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तो संशयीत वसंत जाधव याने दारुच्या नशेत येवुन रविंद्र चव्हाण यास विनाकारण शिवीगाळ केली होती. तेव्हा त्याला समजविण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा राग मनात धरून रमेश पवार यांच्या दुकानासमोरुन सायकल वरुन जात असतांना, दुपारी ४ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत येवुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील कु-हाड रविंद्र चव्हाण याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
तसेच त्याच कुऱ्हाडीच्या दांड्याने दोन्ही हातावर मारुन दुखापत केली व शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. गंभीर जखमी अवस्थेत रवींद्र यास शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी सचिन चव्हाण यांचे फिर्यादीवरून वसंत जाधव रा. चव्हाण तांडा याचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.