जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात दरवर्षी कृषि विभागमार्फत कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि रत्न पुरस्कार वंसतराव नाईक कृषि भूषण, जिजामाता कृषि भूषण, कृषि भुषण (सेदिय शेती), वंसतराव नाईक शेती मित्र, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.