जळगावात आकाशवाणी चौकात केला रास्ता रोको
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायहक्कांच्या मागण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रचे वतीने पाठींबा देण्यात आलाय. शनिवारी २८ रोजी आकाशवाणी चौकात बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
उपोषण स्थळी महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आरती आणि पूजन करण्यात आले. घोषणा देत आकाशवाणी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा,भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर कोळी,मंगलाताई कोळी, लोटन सोनवणे, महेंद्र सोनवणे, राजेंद्र कोळी, विलास घुगे, भगवान धनगर, नितीन तायडे, भिकन सोनवणे, सुभाष सुरवाडे, किरण चौधरी, गोकुळ रडे,सचिन धुमाळ, भैय्या ताडे, रवि बावीस्कर, विजय पाटील,नरेंद्र पाटील यांसह सर्व कोळी बांधव भगिनी आणि बीआरएस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“विनाअट आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे तसेच जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे. यांसह विविध दहा मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकार्यांनी आदिवासी कोळी समाजा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहे . कोळी बांधवांच्या या लढ्यास बीआरएस पक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती यांचे वतीने आम्ही पूर्ण पाठींबा देत आहोत. अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी दिली.