जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कम ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे आयोजित कार्यक्रमात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा वाघ यांनी नविन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच महाविद्यालयाविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी चाईल्ड हेल्थ नर्सिंगच्या एचओडी सहाय्यक प्राध्यापिका अश्विवनी मानकर यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नर्सिंगमधील नियामक संस्था, जीसीऑन मधील विभागासह महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुविधांबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक प्रशिक चव्हाण यांनी परीक्षा योजना, बीएससी नर्सिंग फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालयात स्थापन केलेल्या विविध समित्या याविषयी माहिती दिली. या प्रा.मोनाली बारसागडे यांनी आचारसंहिता, व्यावसायिक शिष्टाचार आणि नर्सचे गुण याबद्दल माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बनसोड व रुद्रेश जोशी या विद्यार्थ्यांनी तर आभार लेक्चरर प्रिती गायकवाड यांनी मानले.
इंडक्शन कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी प्रा.प्रशिक चव्हाण, प्रा.मोनाली बारसागडे यांनी विद्यार्थ्यांना विविध विभागीय केबिन, विभागीय प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालयासह महाविद्यालयाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रंथालय सुविधेबद्दलची माहिती प्रा.प्रिती गायकवाड यांनी दिली. यानंतर विद्यार्थ्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे नेऊन रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया, विविध ओपीडी, मेडिकल स्टोअर, विविध विभागीय वॉर्ड, वैद्यकीय प्रयोगशाळा, एक्स- रे, सीटी स्कॅन आणि एमआरआय विभाग, ऑपरेशन थिएटर दाखविण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम बाल आरोग्य नर्सिंग विभागातर्फे यशस्वीपणे पार पडला.