• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत जळगाव जिल्हा राज्यात दुसरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 26, 2020
in जळगाव
0


जिल्हाधिकारी राऊत यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

जळगाव (प्रतिनिधी ) –  कोणतेही काम असो, मनावर घेतले कि ते काम होतेच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राज्य शासनाच्या “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेची फलनिष्पत्ती. अभिमानाची बाब म्हणजे या मोहिमेत जळगाव जिल्हा हा संपूर्ण राज्यात दुसरा आला आहे. त्याबद्दल शनिवारी २६ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आढावा बैठकीत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. हि बाब जळगावसाठी विशेष मानली जात आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान १५ सप्टेंबर पासून सुरू केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी, ता. जळगाव येथे करण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात ३ हजार आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे. यात महानगरपालिकेच्या १३४, जिल्ह्यातील १८ नगरपालिका,नगरपंचायत क्षेत्रातील ३३७ तर जिल्हा परिषदेच्या २५३३ पथकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” ही मोहीम राज्यात सुरु केली आणि जळगावात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोना पळविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. प्रशासनाच्या प्रत्येक घटकाने प्रामाणिकपणाने मेहनत घेत मोहिमेद्वारा रुग्णशोध सुरु केले आणि त्यात त्यांना निर्भेळ यश मिळाले.

शनिवारी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, तुकाराम हुलवळे आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यात १४ ते २० सप्टेंबर दरम्यान मोहिमेत ऑनलाईन आकडेवारीत १२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ३७२ सारी आजाराचे रुग्ण तर ५ हजार ४४७ दुर्धर आजार असलेले रुग्ण आढळले. हि आकडेवारी ऑनलाईन शासनाकडे जमा होत होती. त्यानुसार राज्यभरात जमा झालेल्या आकडेवारीत “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत उस्मानाबाद पहिले तर जळगाव हे दुसरे आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि त्यांच्या टीमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे.


 

 

Previous Post

पाण्याच्या टँकरखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू

Next Post

सायगाव येथे मन्याड धरणाच्या सांडव्यात पडून तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सायगाव येथे मन्याड धरणाच्या सांडव्यात पडून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव
Uncategorized

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

November 25, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

November 25, 2026
चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला
खान्देश

चिमुकल्या जीवासाठी जळगावचा रस्ता मोकळा! ‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे नवजात बाळ सुरक्षितपणे हैदराबादला

November 25, 2026
शेळगाव बॅरेजमध्ये उडी घेतल्याची घटना; राजू नेरकर यांचा शोध सुरू
क्राईम

शेळगाव बॅरेजमध्ये उडी घेतल्याची घटना; राजू नेरकर यांचा शोध सुरू

November 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

सुरतमध्ये धक्कादायक घटना; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, १३ वर्षीय मुलाने पाईपच्या आधाराने वाचवला जीव

November 25, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद 

November 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon