पालघर | पालघरमधील वाड्यातील एका अल्पवयीन मुलीवर एका 66 वर्षीय वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. वृद्धाने बालिकेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केले. यासंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आलीय.
पीडित मुलगी शेजारी राहणाऱ्या मारुती मानकर यांच्या घरी लसूण आणण्यासाठी गेली होती. दरम्यान घरात कोणीही नसल्याने त्याचा गैरफायदा घेत आरोपी मानकर याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 29 फेब्रुवारीला घडली. या घटनेची माहिती पीडितेने आईला सांगितल्यानंतर आता अरोपीविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.