नवी दिल्ली | जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. यामुळे भारत सरकार समोर कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे मोठे आव्हान उभे आहे. सरकार या व्हायरसपासून सुटका मिळवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यावर लक्ष देत आहे. आतापर्यंत देशात 33 पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. यामध्ये नवीन दोन केस या अमृतसरमधील आहेत. तर 29000 लोक निरिक्षणाखाली आहेत.
31 रुग्ण, 29000 लोक निरिक्षणाखाली
आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसचे 31 रुग्ण आढळले आहेत. या 31 मधील 16 व्यक्ती इटलीमधून भारत भ्रमण करण्यासाठी आले होते. तर 29000 संशयीतांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आली आहे. म्हणजेच जवळपास 29000 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.
मास्कच्या काळ्या बाजाराविरोधात कारवाई
सध्या देशात मास्कची मागणी वाढली आहे. दरम्यान मास्कचा काळा बाजार सुरु झाला आहे. यावर बोलताना आरोग्य मंत्री म्हणाले की, जे दुकानदार मास्क जास्त किंमतीत देतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कारण दुकानदान कमी किंमतीचे मास्क जास्त किंमतीत विकून पैसा वसूल करत आहेत. डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हटले की, ‘मास्कचा काळाबाजर करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी’
डॉ. हर्षवर्धन यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसवर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यांमधून क्वारेनटाइन सुविधा, आयसोलेशन वार्ड्स, टेस्टिंग लॅब तात्काळ तयार ठेवण्याचे सांगण्यात आले. त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यांनी राज्यांना सांगितले की, लोकांपर्यंत कोरोना व्हायरसविषयी सूचना जास्त प्रमाणात पोहोचवाव्यात.