जळगाव ( प्रतिनिधी ) – किनगाव खु. ( ता. यावल ) येथे १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ७ डिसेंबररोजी घडली. तरुणीच्या फिर्यादीयावरून पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरुणी आई, वडिल व आजीसह किनगाव येथे भाजीपाला विक्रिचा व्यवसाय करतात. काल सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान बाजारात तरुणी भाजीपाला विक्रि करित असतांना किनगावातील ओळख असलेला आरोपी राहुल बाळू पवार ( वय माहित नाही ) हा फिर्यादी तरुणीजवळ आला व तुझा मोबाइल नंबर दे व माझा नंबर घे तसेच तरूणीला लज्जापद होईल असे उद्देशाने असा बोलल्यावर तरुणींने आईला सांगितले आरोपी तिथुन पळून गेला. तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि जितेंद्र खैरनार करीत आहेत.







