नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज प्रकरणात जामीनावर सुटल्यानंतर चार दिवसानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी दावा केला आहे की, सुशांतच्या मृत्यूप्रकरणात रियाविरूद्ध खोटी किंवा दिशाभूल करणारी वक्तव्य करणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबरला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने ड्रग्ज केसमध्ये सहभागी असल्याच्या आरोपात अटक केली होती. नुकताच तिला एक महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सर्शत जामीन दिला आहे.
रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी रविवारी एक वक्तव्य जारी करून म्हटले की, मी म्हटले होते की, एकदा रिया जामिनावर बाहेर आली, तर आम्ही त्या लोकांचा मागे लागू ज्यांनी तिला बदनाम केले आणि दोन मिनिटांच्या लिकप्रियतेसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आधार घेतला. आम्ही सीबीआयसाठी त्या लोकांची एक यादी देणार आहोत, ज्यांनी टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रकरणात खोटे दावे केले होते. यामध्ये सुशांत केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या विशेष संदर्भात मोबाईल रेकॉर्डिंग आणि खोट्या गोष्टींचा समावेश आहे. आम्ही तपासाची दिशाभूल करण्यासंदर्भात सीबीआयकडे त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करू.
वकिलांनी विशेषकरून रिया चक्रवतीची शेजारीण डिम्पल थवानीचे या प्रकरणात नाव घेतले आहे. जिने कथितरित्या कुणाला तरी सांगितले होते की, सुशांत सिंह राजपूतने 13 जूनला रिया चक्रवर्तीला घरी सोडले होते. वकिलाने म्हटले की, सीबीआयने रविवारी तिचा जबाब नोंदवला. रियावर सुशांतचे कुटुंब आणि सीबीआयद्वारे आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपात मीनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावर सुद्धा ईडीने तिची चौकशी केली होती.
सुशांतच्या कुटुंबाने आरोप केला होता की, रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्यातून सुमारे 15 कोटी रूपयांची रक्कम ट्रान्सफर केली आहे.