जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मेहरूण भागात राहणाऱ्या व एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील महाविद्यालयीन तरुणीवर मेहरूण तलाव परिसरात बलात्कार केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय तरुणावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित तरुणाला अटक करण्यात आली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
मेहरूण भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर संशयित तरुण दानिश तडवी हा तरुणीच्या घराच्या परिसरातच राहतो. तो तरुणीला ९ वित असल्यापासून ओळखतो. तेव्हापासून तो तिच्या मागावर होता. दोघेही इयत्ता अकरावीत गेले असता २०२१ साली कांताइ धरण परिसरात त्याने तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर सदर तरुणी इयत्ता १२ वीमध्ये असताना २०२२ मध्ये संशयित दानिश याने तिला मेहरूण तलाव परिसरात नेले होते. तेथे एका झाडीत तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. तसेच, फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन हि गोष्ट कोणाला सांगू नको अशी तंबी दिली होती.
त्यानंतर तरुणी आता एका प्रतिष्ठित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतांना तेथेही दानिश येऊन पोहोचला व तिच्याशी अधूनमधून अंगलटपणा करू लागला. त्यामुळे कंटाळून तरुणीने कुटुंबाला तिच्यासोबतची आपबिती सांगितली. तिच्या कुटुंबीयांनी तिला सोबत घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. तेथे संशयित दानिश तडवी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार दानिश याचेवर बलात्कार, विनयभंग,पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक रुपाली महाजन करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली महाजन गुन्हे शोध पथकाचे पोहे का अल्ताफ पठाण पो ना योगेश बारी मुकेश पाटील सचिन पाटील चंद्रकांत पाटील ललित नारखेडे यांनी केली.