खाकीतील सेवाभावाला सलाम! राजेंद्र पाटील यांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती
भडगाव पोलीस ठाण्यात सत्कार


सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव.
भडगाव भडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार राजेंद्र भास्कर पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये ही पदोन्नती करण्यात आली. असल्याचे समजते पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती भडगाव पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
राजेंद्र पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि आपुलकीच्या स्वभावातून नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याची त्यांची कार्यपद्धती नागरिकांच्या पसंतीस उतरली.
वरिष्ठांच्या हस्ते पदोन्नतीचे स्टार प्रदान
राजेंद्र पाटील यांची पदोन्नती झाल्यानंतर भडगाव पोलीस ठाण्यात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भडगाव पोलीस निरीक्षक महेश टाक, उपपोलीस निरीक्षक सुशील सोनवणे व उपपोलीस निरीक्षक किशोर पाटील यांच्या हस्ते त्यांच्या गणवेशावर पदोन्नतीचे स्टार लावण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे नागरिकांच्या मनात वेगळे स्थान
भडगाव येथे सेवाकाळात राजेंद्र पाटील यांनी पोलीस दलातील कर्तव्य बजावताना नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या शांत, संयमी आणि मदतीच्या स्वभावामुळे अनेक नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.
त्यांच्या पदोन्नतीची माहिती समोर येताच सामाजिक, प्रशासकीय, शासकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध समाजबांधव आणि मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ अशी नागरिकांत भावना
पोलीस दलातील जबाबदारी अत्यंत आव्हानात्मक असतानाही राजेंद्र पाटील यांनी आपल्या प्रेमळ आणि आपुलकीच्या स्वभावामुळे भडगावातील नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीनिमित्त नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ‘खाकी वर्दीतील देवमाणूस’ अशी भावना व्यक्त करत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
नवीन जबाबदारीतही राजेंद्र पाटील हे आपल्या कर्तव्यनिष्ठेने आणि सेवाभावाने पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावतील, असा विश्वास व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील पोलीस सेवेसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.








