• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खापरखेडा गाव निधी फाऊंडेशनने घेतले दत्तक!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2020
in जळगाव
0

वर्षभर मासिक पाळी कापडमुक्त अभियान राबविणार :

वैशाली विसपुते यांनी केले मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) – आज आपण सर्वत्र पाहत आहोत की महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात आहे. एकीकडे शहरी भागात महिला स्वतःच्या बळावर पुढे जात असल्या तरी ग्रामीण भागात आजही काही ठिकाणी चित्र वेगळे आहे. आजही महिलांना पुढे जाण्यापासून रोखले जाते. आपल्या कुटुंबियांना शिक्षणाबाबत जागरूक करीत महिला, मुलींनी अबला नव्हे तर सबला म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील यांनी केले. तसेच निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून खापरखेडा गावातील महिलांची विचारधारा नक्की उंचावेल असेही ते म्हणाले.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि.२ रोजी निधी फाऊंडेशनतर्फे खापरखेडा गाव मासिक पाळी, कापडमुक्त अभियानासाठी दत्तक घेण्यात आले. निधी फाऊंडेशनतर्फे वर्षभर गावातील महिला, मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी साहेबराव पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नांद्रा-खापरखेडाच्या सरपंच उषाबाई पाटील, पुंडलीक पाटील, भगवान पाटील, उपसरपंच सुरेखाबाई सोनवणे, राजू पाटील, अंगणवाडी सेविका प्रतिभा इंगळे, सूर्यकांत विसपुते आदी उपस्थित होते.

प्रस्तावना करताना वासुदेव सोनवणे यांनी सांगितले की, नांद्रा आणि खापरखेडा या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये माझे गाव, माझा विकास या तत्वानुसार गावाला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही गावात जातीपातीला थारा न देता उपक्रम राबविले जातात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या संस्थेने खापरखेडा गावासाठी पुढाकार घेतला ही अभिमानाची बाब आहे, असे नमूद केले.
निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांनी सांगितले की, कोणतेही कार्य एकाच दिवसात साध्य होत नाही आम्ही वर्षभर जनजागृती केल्यावर पोखरीतांडा गाव कापडमुक्त झाले. महिलांनी स्वतःच्या स्वच्छतेबाबत सजग रहायला हवे. मासिक पाळी हा शाप नव्हे तर निसर्गाने दिलेली देणगी आहे. भारताच्या दक्षिणेकडील भागात मुलीला मासिक पाळी आल्यावर सोहळा साजरा केला जातो. मासिक पाळीमुळे महिलांना आई होण्याचे वरदान लाभते. शहरी भागात मासिक पाळीबाबत महिला मोठ्याप्रमाणात जागरूक झाल्या आहेत तर ग्रामीण भागात हेच प्रमाण उलट आहे, म्हणून आम्ही ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे. महिलांनी मासिक पाळीत कापड वापरणे सोडावे तर स्वच्छतेचा अवलंब करीत सॅनिटरी नॅपकिन वापरावे, असे आवाहन वैशाली विसपुते यांनी केले. कार्यक्रमासाठी यश विसपुते, हेमंत लोहार, सनी चौधरी, स्वाती सोनगीरे आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

आज केवळ वाजपेयींचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तर..

Next Post

महापौरांनी करून घेतली गणपती नगरात स्वच्छता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापौरांनी करून घेतली गणपती नगरात स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित
क्राईम

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर
Uncategorized

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा
खान्देश

प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

October 29, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
क्राईम

वीजगळतीवरून दोन अभियंत्यांचे निलंबन; २५० अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन

October 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon