चाळीसगाव तालुक्यात देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचा उपक्रम
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन, दहिवद व शारदा नेत्रालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत भव्य नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपून देवरे हेल्थकेअर फाऊंडेशन व श्री समर्थ क्लिनिकतर्फे कळमडू गावातील व परिसरातील गरीब व गरजु लोकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी कळमडू येथील डॉ. योगेश पाटील कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
शिबिरामध्ये १४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० रुग्णांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी धुळे येथे शारदा नेत्रालयात विविध तपासण्या व शस्त्रक्रिया नियोजित तारखेनुसार मोफत केले जाणार आहेत. या शिबिर साठी शारदा नेत्रालय धुळे येथून डॉ.दिपक थोरात, डॉ.मोहनिश, अमोल वानखेडकर, चेतन पाटील, योगेश कुलकर्णी, अमोल रणदिवे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले व आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात रुग्णांना माहिती देण्यात आली.
देवरे हेल्थकेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष मयुर देवरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश अहिरे, सचिन पाटील, निलेश पाटील, उज्जैन पाटील तसेच सर्व पदाधिकारी यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.