जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जळगांव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्याची संक्षिप्त प्रारूप मतदार यादी आज दि. २७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव व भुसावळ या दोन्ही मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ही कमी असते. लोकसभेमध्ये जळगाव व भुसावळमध्ये सर्वाधिक मतदान होते. मात्र विधानसभेमध्ये जळगाव, भुसावळ सोडून इतर विधानसभा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक मतदान हे जास्त असते असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील संक्षिप्त प्रारूप मतदान यादी प्रसिद्ध झाली आहे. एकूण ३४ लाख ७३ हजार ३८३ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये पुरुष मतदार १७ लाख ९९ हजार २९० तर महिला मतदार १६ लाख ५७ हजार ७६ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यात ३५६४ मतदान केंद्र असणार आहेत.
जळगाव, भुसावळमध्ये चार टक्के मतदान हे महिलांचे पुरुषांपेक्षा कमी असते. लोकसभामध्ये जळगाव, भुसावळ सर्वाधिक मतदान जास्त होते. मात्र विधानसभेमध्ये भुसावळ आणि जळगाव या दोन्ही विधानसभांमध्ये मतदानाची आकडेवारी ही कमी असते. जिल्ह्यामध्ये युवा मतदारांची मतदार नोंदणी कमी आहे.