शेतकऱ्यांना कर्ज, पीकविमा व पाण्यासाठी प्रशासन सज्ज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष शेतांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार असून, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित देण्यात आली.

यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी ११ विभागीय बैठका घेण्यात आल्या असून, जळगाव येथे झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, चारा, पीक नुकसान, वीजपुरवठा, कर्जवाटप आणि पीकविमा यासह विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहे. पुढील सहा महिन्यांत शेतकऱ्यांना पाणीटंचाई भासू नये, तसेच चारा व पशुधनाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. व दुष्काळग्रस्त भागासाठी सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे नियोजन असून, अनावश्यक बाबींवर निधी खर्च न करता तो दुष्काळ निवारणासाठी वापरण्याच्या सूचना व केळी, उडीद, सोयाबीन, कापूस यासह विविध पिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करण्याचे निर्देश तसेच एनडीआरएफच्या तांत्रिक निकषांनुसार पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी व जिओ टॅगिंगमध्ये अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी चिंता करू नये; आवश्यकतेनुसार ऑफलाइन प्रक्रियेतूनही मदत देण्याचा सरकार कडून प्रयत्न केला जाईल असे आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, तसेच पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. व पीकविमा योजना प्रभावीपणे राबवून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतरस्त्यांचा प्रश्नही प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. महावितरणचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एक हजार नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या सरकार चा प्रयत्न सुरु आहे. वीजतार चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही आजच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
दरम्यान, एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या सावकारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून देण्यात आल्या.
जिल्ह्यात सुमारे दोन महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे प्रशासनाच्या आढाव्यातून स्पष्ट झाले आहे. चारा ग्रामपंचायतीमार्फत वितरित करण्याचे नियोजन असून, चारा छावण्यांमधील व्यवस्थापनाच्या समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत गावातील पाणी गावात, शहरातील पाणी शहरात आणि शेतातील पाणी शेतात अडविण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील आठ ते दहा महिन्यांत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देतानाच रोजगारनिर्मिती आणि रब्बी हंगामासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. कापसावरील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आजच्या दुष्काळ आढावा बैठकीत देण्यात आले आहेत.
रोजगार हमी योजना व डीपीडीसीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन व दुष्काळजन्य परिस्थितीत अधिकारी मुख्यालय सोडताना परवानगी घेणे बंधनकारक असून, प्रत्येक अधिकाऱ्याने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात सरकार कडून देण्यात आल्या आहेत. शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणात एखाद्या अधिकाऱ्याच्या कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल; मात्र प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असा इशाराही आजच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून देण्यात आला यावेळी जळगाव जिल्ह्यात मंत्री, खासदार, व आमदार सह अधिकारी उपस्थित होते.





