शिरसोलीच्या बारी विद्यालयात उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी दि. १५ रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगावतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिराला इयत्ता आठवी ते बारावीच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सदर शिबिरासाठी अँड .केतन सोनार, अँड .ऐश्वर्या मंत्री तसेच कायदेविषयक व विधी विभागात कॉन्सिलर म्हणून भारती कुमावत हे उपस्थित होते .
शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष प्रवीण पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक निलेश खलसे होते. शिबिराला अँड .केतन सोनार यांनी विद्यार्थ्यांना बाल गुन्हेगार व लैंगिक अत्याचारबाबत कायदाविषयक माहिती दिली. अँड .ऐश्वर्या मंत्री यांनी पोस्को कायदाविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रसंगी भारती कुमावत यांनी मोबाईलचे दुष्परिणाम व बालवयातील चुका याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनीदेखील मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी .जी. कुलकर्णी यांनी केले तर आभार आर .के. पाटील यांनी मानले. सदर शिबिराला पर्यवेक्षिका सुरेखा दुबे, सुनील भदाणे, मनोज बारी, सुनील ताडे, आकांक्षा निकम यांचे सहकार्य लाभले .