जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील समतानगर परिसरातील एका ६० वर्षीय वृद्धाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुदाम बन्सी राठोड (वय ६०, रा. समतानगर) असे मयत वृद्धाचे नाव आहे. रविवारी ते सिंधी कॉलनी परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते.

सिंधी कॉलनी परिसरात एक वृद्ध व्यक्ती पडून असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वृद्धाची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









