• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“सौरभ ज्वेलर्स” दरोडेप्रकरणी सूत्रधारासह तिघांना अटक, दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2024
in जळगाव
0
जळगावात सशस्त्र दरोडा, ६ जण सीसीटीव्हीत कैद

शनीपेठ, एलसीबी पोलिसांची संयुक्त कारवाई

यापूर्वी जळगावसह धुळ्यात दरोडा टाकल्याची कबुली

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरात सौरभ ज्वेलर्स या ठिकाणी पडलेल्या दरोड्याची उकल पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पूर्वी तीन सख्खे भाऊ आणि आता तीन अशा सर्व ६ संशयित आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. दरोड्याविषयी संशयित आरोपी सोनू सारवान याने कट रचला. त्याच्यावर यापूर्वीच नऊ गुन्हे दाखल असून, तो हद्दपार आहे. कट रचल्यानंतर तो दरोडेखोरांना माहिती देत गेला. तसेच अटक करण्यात आलेल्या रितेश आसेरी हा तीन वर्षांपूर्वी सौरभ ज्वेलर्समध्ये कामाला होता. त्यानेच दुकानातील सर्व माहिती दिली, असे तपासात समोर आले आहे.

संशयित आरोपींमध्ये सोनू सारवान, रितेश संतोष आसेरी, दीपक भक्तराज गोयल यांचा समावेश आहे. त्यांना भुसावळ येथून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांकडून एक लाख २० हजार रुपयांची चांदी तसेच दरोड्यात वापरण्यात आलेल्या तीनही दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दरोडाप्रकरणात अटकेच्या कारवाईनंतर इतर तीन गुन्हेदेखील उघड झाल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांनी दिली. यामध्ये शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतच बंगाली कारागिराकडे टाकण्यात आलेला दरोडा याच दरोडेखोरांनी टाकला होता तर इतर दोन घरफोड्याही या तपासादरम्यान उघड झाल्या आहेत. याशिवाय धुळे येथे एक कोटी २५ लाख रुपयांच्या दरोड्यातही यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोर महेंद्र कोठारी यांच्या सौरभ ज्वेलर्स या दुकानावर सोमवार, २० मेरोजी पहाटे दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणात पुणे येथून रणजितसिंग जुन्नी याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने दिलेल्या माहितीवरून सागरसिंग जुन्नी, झेनसिंग जुन्नी या ३ सख्ख्या भावांना अटक करण्यात आली होती.

कोरोना काळात रितेश हा एका रुग्णालयात कामाला होता. त्यानंतर त्याची सोनू सारवानशी ओळख झाली. तेथून घरफोडी, दरोडा असे सत्र सुरु झाले.अटकेतील सहापैकी चार जणांवर या पूर्वीच वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यात सोनू सारवानवर नऊ गुन्हे, रणजितसिंगवर आठ, सागरसिंग व झेनसिंग याच्यावर प्रत्येकी चार गुन्हे दाखल आहेत.


 

 

Previous Post

वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड….बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

Next Post

गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना मिळाले परत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना मिळाले परत

गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना मिळाले परत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon