* आरोग्य प्रशासनच अक्षम्य उदासिनतेच्याङ्ग कोरोनानेफ बाधित !
जळगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणूंच्या जगभरातील धास्तीनंतर जळगावचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय अक्षम्य उदासिनतेच्या मु्द्यावर नव्याने चर्चेत आले आहे. आरोग्य खाते सर्वत्र दक्षतेची ग्वाही देत असले तरी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात बेड नसल्याने 10 पैकी 6 व्हेंंटीलेटर यंत्रे धुळखात पडून आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासनच अक्षम्य उदासिनतेच्या ङ्ग कोरोनानेफ बाधित असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
कोणत्याही आजारातील गंभीर रूग्णांची जीवन- मरणाची लढाई सुरू असताना त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी व्हेंंटीलेटर यंत्रांचा मोठा आधार असतो. येथे पुर्वीचे जिल्हा सामान्य रूग्णालय होते तेव्हापासूनच अतिदक्षता विभागात बेड नसल्याने 10 पैकी 6 व्हेंंटीलेटर यंत्रे धुळखात पडून आहेत. फक्त 4 रूग्णांनाच या यत्रणेचा फायदा घेता येतो. त्यामुळे मोठ्या आशेने येथे येणारे गरीब रूग्ण अशा अर्धवट सुविधांमुळे दगावल्याचे व काही तक्रार किंवा चौकशी झाली तरी नेहमीच्या सरकारी पध्दतीने सारवासारव केली जात असल्याचे अनुभव काही कर्मचार्यांनीच नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर कथन केले. येथे काही यंत्रे कापडाने झाकून ठेवलेली आहेत तर काही एका बंद खोली नेऊन ठेवलेली आहेत. गरीब रूग्णांना त्यांची ऐपत नसताना नाईलाजाने खाजगी रूग्णालयांची पायरी चढावी लागते आहे.
केवळ बेड नसल्याने ही सहा व्हेंटीलेटर यंत्रे वर्षानुवर्षे पडून आहेत. आता हे वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने परिस्थितीत सुधारणा होतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती मात्र ती फोल ठरली आहे. आता तरी गरीब रूग्णांच्या या वाढलेल्या अपेक्षांचा विचार करून आरोग्य खात्याने या व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढवावी व अतिदक्षता विभागाचा सुविधांसह कर्मचारी वाढवून विस्तार करावा अशी मागणी होते आहे. रूग्णांची गर्दी व अपेक्षांच्या तुलनेत येथील अतिदक्षता विभाग सुविधांनी सज्ज नसल्याने सर्वांचाच हा सरकारी भ्रमनिरास दिवसेंदिवस जीवघेणा ठरतो आहे. कोरोना विषाणुंच्या धास्तीच्या चर्चेने या रुग्णालयातील घाणीचे साम्राज्य आरोग्य प्रशासनाच्या कामचुकार मानसिकतेचे प्रतिक ठरते आहे.
यासंदर्भात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे म्हणाले की, 10 बेडची नियोजित क्षमता असलेल्या या अतिदक्षता विभागात अनेक गंभीर रूग्ण येतात, येथील डॉक्टर्स व यंत्रसामग्री वापरून आम्ही त्यांना वाचवण्यासाठी शथीर्र्चे प्रयत्नही करतो मात्र काही वेळेस अगदी शेवटच्या क्षणी आलेले रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील व्हेंटीलेटर यंत्रे बंद असल्याच्या परिस्थितीची आधी मी माहिती घेतो , त्यानंतरच मला याबद्दल बोलता येईल.