जळगाव (प्रतिनिधी) :- महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी बुधवार दि.७ रोजी सायंकाळी स्थायी समितीच्या सभेत सन २२४-२५ चे ९८१ कोटी ४७ लाखांचे अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सादर केले. कोणतीही कर वाढ न करता २७ कोटी ९५ लक्ष रुपये शिलकीचे हे अंदाजन पत्रक सादर करण्यात आले आहे. कर वाढ नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून पुढील महासभेत आयुक्त प्रशासकांना हे अंदाजपत्रक सादर करतील . त्यानंतर प्रशासकांकडून त्यात दुरुस्ती सुचविण्यात येईल व सुधारीत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात येणार आहे.
सन २०२४-२०२५ च्या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक करवाढ न करता २७ कोटी ४७ लाख शिलकीचा अर्थ संकल्प
१६८ कोटी २२ लक्ष रुपयांची दाखविण्यात आली आहे. अंदाजपत्रकात शहरातील नवीन रस्त्यासाठी १५ कोटी ५० लाखांची तरतुद करण्यात आली असून नवीन गटारीसाठी ६ कोटी १५ लाख, नवीन संडास मुत्रीसाठी ६० लाख, नवीन पुतळ्यासाठी २ कोटी, नवीन वाहन खरेदीसाठी २ कोटी, नवीन बोगदा, उड्डानपूलासाठी ५० लाख, दीक्षाभूमी भूमीसंपादनासाठी १० कोटी, कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
आहे. तर, नगरसचिव विभागाकरीता १२ कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याच प्रमाणे उद्याने व्यवस्था व दुरुस्ती सुशोभिकरणासाठी १ कोटी ७० लक्ष, रस्ते दुरुस्तीवर ३ कोटी ४१ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली असून वेतनावर ८३ कोटी ८ लक्ष रुपयांचा खर्च होणार आहे. तर, पथदिवे, प्रशासकीय इमारत व मनपा इमारतीच्या विज देयकासाठी ४ कोटी ९० लक्ष रुपयांची तरतुद केलेली आहे. निवृत्ती वेतनाकरीता १२ कोटी ५९ लक्ष रुपयांची तरतूद असून नवीन वाहने खरेदीकरीता २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक १६८ कोटी २२ लक्ष असून महसुली जमा ३८१ कोटी ३२ लक्ष आहे. तसेच भांडवली जमा ३०१ कोटी ४३ लक्ष असून असाधारण देवाण घेवाण ७६ कोटी ४ लक्ष आहे तर, परिवहन विभागाचे ५० लक्ष, पाणी पुरवठा विभागाचे ४० कोटी १६ लक्ष व मलनिस्सारणातून ३ कोटी ८० लक्ष अशी एकुण जमा बाजू ९८१ कोटी ४७ लक्ष रुपयांची आहे.
सन २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात महसुली खर्च ४४० कोटी ४४ लक्ष, भांडवली खर्च ३६९ कोटी ४४लक्ष, असाधारण देवाण घेवाण ८९ कोटी २८ लक्ष परिवसहन विभागावर ५० लक्ष, पाणी पुरवठा ४६ कोटी १७ लक्ष, मलनिस्सारण ७ कोटी ७९ असा खर्च होणार असून अखेरची शिल्लक २७ कोटी ९५ लक्ष रुपयांची राहणार असल्याचे अंदाजपत्रकात नमुद करण्यात आले आहे.