• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुणावर गोळीबार करून तीन जण फरार, एमआयडीसीत सकाळचा थरार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2023
in Uncategorized
0
शिवाजीनगर गोळीबारप्रकरणी परस्परांवर गुन्हे दाखल, ८ अटकेत

जळगावात गोळीबाराच्या घटनांत होतेय वाढ

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एमआयडीसी परिसरातील प्रभा पॉलिमर सेक्टर या ठिकाणी २४ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून एकाने गावठी बंदुकीतून दोन गोळ्या झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशयित आरोपी हा इतर दोघांसोबत फरार झाला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक मारेकऱ्यांच्या मागावर असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमध्ये पुन्हा गोळीबार झाल्यामुळे पोलिसांचे डोकेदुखी वाढली आहे.

आकाश प्रेम तंवर (वय २४, रा. गजानन पार्क, कुसुंबा ता. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. तो गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता कंपनीत कामावर जात होता. एमआयडीसी सेक्टर नंबर व्ही येथील प्रभा पॉलिमर कंपनी जवळ जात असताना आकाश तंवर त्याचा मित्र रोहित पवार तसेच अनिल सैंदाणे, समाधान पाटील, भरत चांदवडे, धीरज पवार हे गप्पा करीत उभे असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी स्वप्निल उर्फ सोपान चंदूसिंग मोरे (रा. गजानन पार्क, कुसुंबा) हा त्याचे मित्र विपुल पाटील व अजय पाटील (दोन्ही रा. कुसुंबा) यांच्यासोबत आला. स्वप्नील आकाश तंवर याला म्हणाला की, बब्या कुठे आहे, त्याने तुझ्या सांगण्यावरून मला मारले आहे. आज तुमच्या दोघांचा गेम करतो. त्यावर आकाश तंवर याने, बाब्याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले.

मात्र त्याचे वाईट वाटून स्वप्नील मोरे याने कमरेला लावलेला बंदूक कट्टा काढून आकाश तंवर याच्यावर रोखला. आधी तुझे व नंतर बब्याचे काम करतो असे स्वप्निल मोरे म्हणाला. त्यावेळी त्यानी गोळी झाडली. पण आकाशने खाली वाकून गोळीचा नेम चुकवला आणि रस्त्यात पडलेला दगड उचलून संशयित स्वप्नील मोरे यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर स्वप्निल मोरे याने पुन्हा दुसरी गोळी आकाश तंवर याच्यावर फायर केली. ही गोळी आकाशच्या अंगाच्या जवळून गेली. नंतर पुन्हा तिसरी गोळी झाडत असताना त्याचे बंदूक अडकले. त्यामुळे घाबरून आकाश याने पुन्हा दुसरा दगड उचलून त्याच्यावर फेकत असताना स्वप्नील मोरे आकाश याच्या जवळ गेला. डोक्यावर बंदुकीने मारले. नंतर आकाशच्या हातात दगड सापडल्याने तो पळून गेला.

ही घटना आकाश तंवरच्या मित्रांनी पाहिली. संशयित स्वप्नील मोरे यांच्यासोबत आलेले विपुल पाटील, अजय पाटील हे लगेच मोटरसायकल घेऊन त्याच्यामागे गेले आणि त्याला दुचाकीवर बसून प्रभा पॉलिमर येथून निघून गेले. त्यानंतर आकाश तंवर याने त्याचा काका राजेश पवार यांना घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. त्या ठिकाणी त्याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावित, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना झाले आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgaon-golibar-news/
Previous Post

ट्रकमधून पावणे पाच लाखांच्या मुद्देमालाची चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी स्वीकारली अडीच हजारांची लाच

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी स्वीकारली अडीच हजारांची लाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

शेतातील सोलर मोटार व वायरची चोरी; १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026
भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव दुचाकीची धडक; दोन युवक जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon