गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगावचा उपक्रम
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव, ८ एप्रिल २४ रोजी जागतिक आरोग्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमीत्ताने जळगाव खुर्द येथील जि.प प्राथमिक शाळेत जावून जनजागृती करण्यात आली.
दरवर्षी ८ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे एक विशेष थीम निश्चित केली जाते. यावर्षी ’माय हेल्थ माय राईट’ ही थीम घेऊन जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. ही थीम हे दर्शवते की आरोग्य हा मानवी जीवनाचा खरा पाया आहे. तसंच कोणत्याही व्यक्तीचं आरोग्य हा त्याचा हक्क आहे.सर्वप्रथम डीपार्टमेंट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या बीएस्सी व एम एस्सीच्या विदयार्थ्यांनी महाविद्यालयात आहाराचे महत्व विविध फलक व खादयपदार्थ रांगोळीच्या माध्यमातून पटवून देण्यात आले. यानंतर जळगाव खुर्द येथे जिप प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांना फलक व विदयार्थ्यांच्या बोलीभाषेत हातवारे करत डिव्हायना पवार यांनी गाण्याच्या माध्यमातून हँन्डवॉशचे महत्व पटवून देण्यात आले.
या विभागाच्या प्रमुख प्रा.जेसिंथ धाया,प्रा निर्भय मोहोड,प्रा स्वाती गाडेगोणे यांनी मार्गदर्शन केले.डिव्हायना पवार, रूचिता समरीत, अश्लेषा मून आणि प्राजक्ता आरख यांनी परिश्रम घेतले.