तापी नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात १९८ घमीप्रसे एवढा विसर्ग होत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्हाणपूर ०.२ मिमी, टेक्सा १६.८ मिमी, एरंडी १३.४ मिमी, गोपालखेडा १६.६ मिमी, लखपुरी ५.६ मिमी, लोहारा १९ मिमी, अकोला ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. यामुळे धरणाचे सहा दरवाजे अर्धा मीटरने वर उचलण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे, तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढविला जाण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.