रावेर पोलीस स्टेशनची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) :- शहरातील कुरेशी मोहल्ला भागात उघड्यावर गोमांसची विक्री होणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापा मारून कारवाई केली आहे. यात ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २९६ किलो वजनाचे ५३ हजार ८०० रुपयांचे गोमांस जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना शहरातील कुरेशी मोहल्ला येथे अवैधरीत्या गोमांस बाळगून त्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक डॉ. जयस्वाल यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, पोलीस शिपाई महेश मोगरे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे व संभाजी बिजागरे यांचे पथक सदर ठिकाणी पाठवले. या पथकाला कलीम खान हिरे खान, शेख चांद शेख रहेमान, शेख लाल शेख कडू, शेख समीर शेख नसीर, शेख आल्तमश शेख अख्तर, शेख अल्ताफ शेख गफ्फार कुरेशी, शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेशी, शेख फरीद शेख रहेमान, सोहेल रफिक शेख, (सर्व रा. कुरेशी मोहल्ला, रावेर) हे ९ जण उघड्यावर गोमास कब्जात बाळगून विक्री करीत असताना आढळून आले.
या सर्वाना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून अंदाजे २९६ किलो वजनाचे एकूण ५३ हजार ८०० रुपयांचे रुपये किमतीचे गोमांस जप्त केले आहे. संशयित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना रविवारपर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तसेच पुढील तपास एपीआय अंकुश जाधव करीत आहे.