
जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे डॉ. अक्षता पाटील सभागृहात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करण्याची शपथ घेतली.
भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि प्रत्येक नागरिकाची घटनात्मक जबाबदारी याविषयी यावेळी जनजागृती करण्यात आली. संविधानातील आदर्श आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, जागरूकता आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना दृढ झाली.









