
सांगवी खुर्द शिवारातील घटना; १४ हजार रुपये आणि म्हैस लंपास
यावल, ( प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारात शेतातील गोठ्यातून म्हैस आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नोंदीनुसार, फिर्यादी आधार पाटील (वय 72 वर्षे, व्यवसाय शेती) यांच्या शेतातील गोठ्यातून १४ हजार रुपये रोख रक्कम तसेच काळ्या रंगाची, मुऱ्हा जातीची, आतल्या बाजूला वळलेली कुंडलाकार शिंगे असलेली अंदाजे आठ वर्षांची म्हैस चोरीला गेली आहे.
ही घटना २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेपासून २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या दरम्यान सांगवी खुर्द शिवारातील गट क्रमांक १२७ मधील बांबूच्या खळ्यात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या चोरीप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी अद्याप अज्ञात आहेत.









