
१५ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, चांदीचे पायल व नाणी चोरीला; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर, ( प्रतिनिधी ) : रावेर शहरातील सोमेश्वर नगर, स्टेशन रोड परिसरात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नोंदीनुसार, फिर्यादी अशोक कोटवानी (वय ४३, व्यवसाय जनरल स्टोअर) यांच्या घरात २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४५ ते २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान चोरी झाल्याचे नमूद आहे.
चोरट्यांनी घरातून १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, तसेच चांदीचे पायल व नाणी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. आरोपी अद्याप अज्ञात आहेत.








