जम्मू विद्यापीठात होणाऱ्या स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे करणार प्रतिनिधित्व
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयातील तब्बल आठ खेळाडूंनी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. जम्मू विद्यापीठ, जम्मू येथे दिनांक ४ ते १२ डिसेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :
1. कु. सायली पाटील – तृतीय वर्ष, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
2. कु. सोनम गुंजाळ – द्वितीय वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
3. चि. तेजस पाटील – अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AIDS) इंजिनिअरिंग
4. कु. वैष्णवी साबळे – अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AIDS) इंजिनिअरिंग
5. चि. मयूर कोळी – अंतिम वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग
6. चि. तुषार पाटील – द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AIDS) इंजिनिअरिंग
7. कु. साक्षी उबाळे – अंतिम वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
8. कु. निसर्गा पाटील – द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (AIDS) इंजिनिअरिंग
या खेळाडूंनी आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कौशल्याची छाप पाडली असून त्यांच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, विभाग प्रमुख आणि शिक्षकवृंदाच्या वतीने सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून आगामी स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.









