जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसीई स्कूल, जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमत्त मॅरेथॉन रन फॉर युनिटीचे आयोजन करुन अभिवादन केले.
भारत हा संस्कृती, भाषा आणि परंपरांनी समृद्ध बहुसांस्कृतिक देश आहे. भारतातील एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित् साजरा केला जातो. त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ, एकता या आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे मॅरेथॉन रन फॉर युनिटी आयोजित केली गेली. यामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि परंपरांची विविधता व विविध भाषा, धर्म आणि परंपरा असूनही प्रत्येक भारतीय एकतेच्या समान धाग्याने बांधलेला आहे हे आपल्या या कृत्यातून दाखवून दिले. राष्ट्रीय एकता दिवसाला भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मॅरेथॉन रन फॉर युनिटीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक, लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण केले.