जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स व बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागामार्फत करिअर पाथवे फॉर डाटा सायंटिस्ट या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्षदा विजयकुमार पाटील (डाटा सायंटिस्ट) या उपस्थित होत्या. तसेच त्यांच्यासोबत प्रथम वर्ष विभागाचे प्रमुख डॉ. नितीन भोळे व डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख आयडीएस) सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
अक्षदा पाटील यांनी टीसीआर इनोव्हेशन पर्सन आयएफडब्ल्युवाय तसेच अँटी फिशिंग डिटेक्शन एनालिसिस, सेल्स प्रेडिक्शन, स्पॅम मेल प्रेडिक्शन, लाईफ एक्स्पेक्टन्सी प्रेडिक्शन प्रोजेक्टवर काम केलेले आहेत. झुरे,ए आय फंन्डामेंटल, डाटा अॅनेलेसिस विथ पायथॉन,बेसिस ऑफ पॉवर बी आय प्रमाणपत्र मिळवले आहे. डॉ. नितीन भोळे यांनी आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अक्षदा पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये डाटा सायंटिस्ट या क्षेत्रामधील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला.त्यामध्ये त्यांनी अभ्यासासाठी लागणारे मटेरियल तसेच वेबसाईट प्रिपरेशन, त्याचप्रमाणे डाटा सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी आवश्यक असणारे गुणवैशिष्ट्ये त्याचप्रमाणे डाटा सायंटिस्ट साठी वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे रियल वर्ड एप्लीकेशन्स ऑफ डाटा सायन्स आणि सध्याचे अकॅडमिक्स यामध्ये आपण कशाप्रकारे संधान साधू शकतो या महत्त्वाच्या गोष्टींवर संवाद साधला.तसेच डाटा सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत फक्त विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यायला हवा असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची त्यांनी मुद्देसूद व समाधानकारक उत्तरे दिली. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व डॉ.केतकी पाटील मॅडम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ.अनिल कुमार विश्वकर्मा यांनी काम पाहिले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा पाटील व करिष्मा नारखेडे या विद्यार्थिनींनी केले.