जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील रिसर्च विभागाच्या वतीने ‘संशोधन लेखन व प्रकाशनाची प्रक्रिया’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अक्षता पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयाचे डॉ. निलेश बेंडाळे (एमबीबीएस, एमडी, एसीएमई, ) यांनी संशोधन लेखाची रचना, विषयाची निवड, शास्त्रीय पद्धतीने लेखन, संशोधन निष्कर्षांचे सादरीकरण तसेच संशोधन लेख प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी संशोधनाकडे केवळ शैक्षणिक गरज म्हणून न पाहता ज्ञाननिर्मितीचे प्रभावी माध्यम म्हणून पाहावे, असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. हेमांगी मुर्कुटे यांनी केले. प्रा.रोशनी भगत यांनी सूत्रसंचालन केले, तर तांत्रिक सहकार्य प्रा. जॉय यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. मेघा दुपारे यांनी केले.
या व्याख्यानास एकूण ५० सहभागी उपस्थित होते. संशोधन लेखन व प्रकाशनाच्या विविध टप्प्यांची स्पष्ट माहिती मिळाल्याने सहभागींसाठी हे व्याख्यान माहितीपूर्ण, शैक्षणिक, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी ठरले. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होण्यास तसेच शैक्षणिक प्रकाशनासाठी आवश्यक आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.








