राज्यातील ५५ महाविद्यालयांपैकी जळगावच्या “जीएमसी” ला बहुमान
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाची विद्यार्थी परिषदेच्या प्रतिनिधींची निवड जाहीर झाली आहे. यात राज्यातील ५५ एमबीबीएस महाविद्यालयातून जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जनरल सचिव राजसिंग छाबरा याची विद्यार्थी परिषदेवर निवड झाली आहे. त्यामुळे जळगावच्या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र आरोग्य विद्यान विद्यापीठाने विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठन केली. यात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ५५ महाविद्यालयाच्या जनरल सचिवांपैकी ५ जणांना विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर घेण्यात आले. यात पहिल्यांदाच जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या जनरल सचिवाची निवड झाली आहे. यात राजसिंग छाबरा याची निवड झाल्याने जळगावच्या महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक बहुमान प्राप्त झाला आहे.
राजसिंग याच्या निवडीबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.