• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2026
in Uncategorized
0
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात असलेल्या रुबी पेंट्स कंपनीत झालेल्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरातील आंतरराज्य टोळीतील सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांची एअरपोर्ट परिसरात रुबी पेंट्स नावाची कंपनी असून ते तेथेच वास्तव्यास आहेत. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी बोहरा कुटुंबीय बाहेरगावी गेले असता, दि. १५ एप्रिलच्या पहाटे चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील दुर्गम भागात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने मध्य प्रदेश गाठत चाचरीया पाटी व खरगोन परिसरात वेशांतर करून आरोपींवर पाळत ठेवली आणि मोठ्या शिताफीने सहा जणांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींमध्ये निलेश उर्फ भुऱ्या माहेरीया डुडवे (रा. धावडा), ताराचंद पठाण सोलंकी, सायसिंग राकेश सोलंकी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे व ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व रा. चाचरीया पाटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

जप्त मुद्देमालात सुमारे ३९ ग्रॅम सोन्याचे दागिने (५,४७,५०० रुपये), ९९ ग्रॅम चांदीचे दागिने (२५,००० रुपये) तसेच ५,७८,००० रुपये रोख रक्कम असा एकूण ११,०५,५०० रुपयांचा माल समाविष्ट आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.


 

 

Previous Post

जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय

Next Post

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

जळगाव बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारे दोघे जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उमैर रियाज देशपांडे यांचे एम.बी.बी.एस. अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 21, 2026
ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत लूट; ६,४८४ रुपयांचा ऐवज लंपास

June 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

पहूर कसबे येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; सव्वा लाखाची रोकड लंपास

June 21, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

जळगाव हादरले! पाथरी येथे अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार; एमआयडीसी पोलिसांकडून नराधम अटकेत

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon